- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा धान्य माल ई- लिलावानुसार खरेदी करण्यासाठी १४ एप्रिल २०१६ पासून ई-नाम योजना सुरू केली आहे. ही योजना येथील बाजार समितीने अमलात आणली असली तरी शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविली आहे. तर या योजनेपासून अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक लिलावालाच पसंती दर्शवली आहे.आतापर्यंत ई-नाम योजनेंतर्गत मूर्तिजापूर बाजार समितीत ७ हजार ९४८ शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. पैकी केवळ २ हजार ४७० शेतकऱ्यांनी आपला माल विकला आहे. यासाठी ८७ अडते व ५९ व्यापाऱ्यांनीही आपली नोंदणी केली आहे. या योजनेत माल विक्रीसाठी कमालीचा वेळ लागतो व कुठल्याही व्यापाºयाला कुठेही माल खरेदी करण्याची मुभा असल्याने अनोळखी व्यापाºयाकडून विक्री रक्कम मिळेल याची हमी नाही.पारंपरिक लिलावात ठरलेल्या व्यापाºयाकडून आगाऊ रक्कम घेण्याची प्रथा असल्याने ज्या दिवशी माल विकल्या जाईल, त्या दिवशी रक्कम कपात होते. शेतकºयांची ही अडचण व्यापारी भागवित असल्याने पारंपरिक लिलावच शेतकºयांसाठी सोईचा असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.या योजनेंतर्गत बाजार समितीमध्ये शेतमालाच्या पारंपरिक बोली पद्धतीचे लिलाव बंद करून त्याऐवजी आॅनलाइन लिलावासाठी ई-नाम हे व्यापार पोर्टल तयार करण्यात आले. सरकारने यासाठी बाजार समितीला ३० लाख रुपये किमतीचे संगणक, प्रिंटर, राउटर यांच्या खरेदीसह शेतमालाच्या गुणवत्ता व आर्द्रता तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात आली. मिळविलेले अनेक साहित्य या बाजार समितीसाठी निरुपयोगी ठरले.
अशी आहे ई-नाम योजनाई-नाम (इंटरनॅशनल अॅग्रीकल्चर मार्केटिंग) या योजनेत मालाची गुणवत्ता तपासणी केली जाते. तो अहवाल शेतकºयाला मिळतो. शेतमालाचा फोटो पोर्टलवर अपलोड केला जातो. त्यानंतर मोबाइल अॅपवरून देशातील कोणताही व्यापारी कुठेही बसून लिलावात भाग घेऊ शकतो. व्यापारी आणि शेतकºयांना ही प्रक्रिया आनलाइन दिसते. शेतकरी मिळणाºया दराबाबत समाधानी असेल तरच मालाची खरेदी-विक्री होते. या लिलाव प्रक्रियेत अडते आणि मध्यस्थ नाहीत. मालाचे वजन झाल्यानंतर प्रत्यक्षात अडत्याला त्याचा ताबा मिळण्यापूर्वीच शेतकºयाच्या खात्यावर आॅनलाइन पैसे जमा केले जातात. देशातील कोणत्याही बाजारात मालाची विक्री करता येते.केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेत बाजार समिती दुसºया टप्प्यात आहे. सद्यस्थितीत शेतकºयांची नोंदणी करणे व त्यांच्या मालाचा ई-लिलाव करण्यासाठी बाजार समिती प्रयत्नरत आहे.- रितेश मडगे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तिजापूर