अकोला: आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यभरामध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा सुरू केली. या रुग्णवाहिकेसाठी १0८ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला. गरजू रुग्णाने या क्रमांकावर संपर्क साधल्यास, त्याला २0 ते १५ मिनिटांमध्ये रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करण्यात येते. रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होत आहे. गत वर्षभरामध्ये अमरावती विभागामध्ये ७४ हजार ८६६ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. संकटकाळात या रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. अपघात, सर्पदंश, हृदयविकाराचा झटका, महिलेची प्रसूती, हल्ला प्रकरणातील जखमी रुग्ण, भाजलेल्या रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचविण्याचे कार्य या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी या रुग्णवाहिका महत्त्वाच्या ठरत आहेत. १0८ क्रमांकावर फोन करून रुग्णाचे नातेवाईक अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लाभ घेत आहेत. फोन लावल्यावर अवघ्या काही मिनिटांतच रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल होत असल्याचा अनुभव आहे. रुग्णवाहिकेमध्ये अत्याधुनिक उपकरणे आहेत. यात कृत्रिम श्वासोच्छवास यंत्र, रक्तदाब यंत्र, सलाइनची व्यवस्था आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेमध्येच प्रारंभिक उपचार करण्यात येतात. २0 मार्च २0१४ ते जानेवारी २0१६ या कालावधीमध्ये अकोला जिल्ह्यातील ११ हजार १४६ रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला. शेकडो रुग्णांना रुग्णवाहिकेच्या सेवेतून जीवनदान प्राप्त झाले. रुग्णवाहिकेचा लाभ घेणार्या अमरावती विभागातील रुग्णांची संख्याअकोला - १११४६अमरावती- १९0८७बुलडाणा- १५६११वाशिम- ९४३८यवतमाळ- १९५८४अकोला जिल्ह्यात १५ रुग्णवाहिका अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या पाहता, शासनाकडून १५ अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात चार अँडव्हांस लाइफ सेव्हिंग रुग्णवाहिका आणि ११ बेसिक लाइफ सेव्हिंग रुग्णवाहिकांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात २३, अमरावती जिल्ह्यात २७, यवतमाळ जिल्ह्यात २३ आणि वाशिम जिल्ह्यात ११ अशा एकूण ९९ रुग्णवाहिका धावताहेत.४५ चिकित्सक, ३५ सहायकअकोला जिल्ह्यात धावणार्या १0८ क्रमांकाच्या १५ रुग्णवाहिकांसाठी ३५ चालक आहेत. आपत्कालीन स्थितीत सहायक दोन चरणांमध्ये काम करतात. यात ४५ चिकित्सक रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना जवळपासच्या रुग्णालयांमध्ये सुरक्षित नेण्यासाठी कार्यरत आहेत.
अमरावती विभागात ७४ हजार रुग्णांना आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा लाभ!
By admin | Published: March 10, 2016 1:55 AM