अकोला : आगामी काळातील सण, उत्सव लक्षात घेता पोलिस खात्याकडून महसूल विभागाकडे शहरातील सराईत गुन्हेगारांचे प्रस्ताव तडीपारीसाठी पाठविण्यात आले होते, यापैकी ७९ गुन्हेगारांना तडीपार करण्याचा आदेश उप विभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिला आहे.२ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी, ३ सप्टेंबर रोजी दहीहंडी व कावड - पालखी उत्सव मिरवणूक होत आहे. ४ सप्टेंबरला गोगा नवमी, ९ सप्टेंबरला पोळा सण असून, १० सप्टेंबरला पोळ्याची कर आहे. तसेच ११ सप्टेंबरला मोहरम उत्सव, १२ सप्टेंबर रोजी हरतालिका, १३ सप्टेंबर रोजी श्री गणेश स्थापना उत्सव साजरे करण्यात येणार आहे. या उत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश दिला होता. त्या अनुषंगाने शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांनी तडीपारीचे प्रस्ताव सादर केल्यानंतर ७९ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकारपोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना प्राप्त असलेल्या अधिकारान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाºयांना विशेष व जादा अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. सण, उत्सव काळासाठी हे अधिकार राहणार आहेत.१५ गुन्हेगार तीन व सहा महिन्यांसाठी तडीपार!शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा सण, उत्सवानिमित्त प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत १५ गुन्हेगारांना प्रत्येकी तीन व सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा आदेश उप विभागीय अधिकारी महसूल यांनी जारी केला आहे.पोलीस स्टेशन संख्याएमआयडीसी १२खदान ०६जुने शहर १३अकोट फैल १५सिव्हिल लाइन ११डाबकी रोड १०रामदास पेठ ०७सिटी कोतवाली ०५