अकोला: बुद्ध पौर्णिमेच्या शुभ्र चंद्रप्रकाशात करण्यात आलेल्या वन्य प्राण्यांच्या गणनेत अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात एकूण ८९६ वन्य प्राणी आढळून आल्याचे रविवारी सांगण्यात आले. पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेल्या संपूर्ण वन्य प्राण्यांची गणना करण्यास ह्यरेड डाटाह्ण या आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्थेने प्रारंभ केला. यापासून प्रेरणा घेत देशांतर्गत पसरलेल्या वनपरिक्षेत्रांतील तृणभक्षी व मांसभक्षी पशूपक्ष्यांची माहिती गोळा करणे राष्ट्रीय वन्यजीव विभागाने सुरू केले. वनपरिक्षेत्रातील नैसर्गिक संपत्ती व वन्य जीवनाचे जतन करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात वननीतीचा अंतर्भाव करण्यात आला. वैशाखातील बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात २१ मे रोजी काटेपूर्णा अभयारण्यात वन विभाग आणि निसर्गप्रेमींनी वन्य प्राण्यांची गणना केली. शनिवार, २१ मे रोजी दुपारी ३ ते रविवार, २२ मे रोजी सकाळी १0 वाजेपर्यंत पाणवठय़ांवर बिबट, अस्वल, निलगाय, कोल्हे असे एकूण ८९६ वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत काही प्राण्यांची संख्या वाढली आहे, तर काही प्राण्यांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले. तथापि, गतवर्षीच्या तुलनेत आढळून आलेली एकूण प्राण्यांची संख्या यावर्षी वाढली आहे.
काटेपूर्णा अभयारण्यात आढळले ८९६ वन्य प्राणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2016 1:53 AM