----------------
व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
तेल्हारा : गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग आजाराने कहर केल्यामुळे शासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन जाहीर केला होता़ त्यामध्ये धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी होती़ त्याचा फटका लग्नसमारंभावरसुद्धा बसल्याने लग्नसमारंभाशी निगडित बँड पथक, फोटोग्राफी, मंगल कार्यालय, फुले व्यवसाय, घोडेवाले इत्यादी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ त्यामुळे शासनाने मदत देण्याची गरज आहे. शिथिलता द्यावी, अशी मागणी हाेत आहे.
----------------------
पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची गरज
बाळापूर : खिरपुरी ते बारलिंगा हा गावाकडील पाणंद रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बारलिंगा, खिरपुरी बु., खिरपुरी खु, येथून येणारे बरेच नागरिक या रस्त्याने येणे जाणे करतात. पाणंद रस्त्यांची दैना झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
------------------
सिमेंट दरवाढीचा बांधकामाला फटका
अकोट : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे.
---------------------
कांदा बीजोत्पादन काढणीला वेग
पातूर : रब्बी हंगामात हिवरा आश्रम शिवारात प्रगतिशील शेतकऱ्यांनी बीजोत्पादन कांदा लागवड केली आहे. अनेकांचा कांदा बीजोत्पादन काढणीला आलेला आहे. तालुक्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने बागायती क्षेत्र वाढले आहे.
---------------------------------
वीज पुरवठा नसल्याने शेतकरी अडचणीत
वाडेगाव : परिसरातील देगाव, टाकळी खुरेशी, खिरपुरी भागात कृषी पंपांचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कोटेशन भरूनही काही शेतकऱ्यांना आजपर्यंत विद्युत जोडणी मिळालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़
------------------------
बाळापूर तालुक्यात ३६८ ॲक्टिव्ह रुग्ण
बाळापूर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, मंगळवार, दि. १८ मे रोजी प्राप्त अहवालानुसार, ४२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ३६८ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.