अविरोध निवडून आलेल्यांमध्ये कार्ला बु. येथील दाेन, सौंदाळा येथील एक, चांगलवाडी ग्रामपंचायतमध्ये सात जणांची अविराेध निवड निश्चित झाली आहे. ही ग्रामपंचायत अविरोध झाली आहे. रायखेड येथून पाच जण अविरोध निवडून आले आहेत. हिंगणी बु. येथील दाेन, आडगाव बु. येथे चार जण अविरोध निवडून आले आहेत. गोर्धा येथे तीन, शिरसोली येथे तीन, वरुड बु.: येथील उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. राणेगाव येथे चार, जस्तगाव येथे एक, तर भांबेरी येथे दाेन उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. मनब्दा येथे पाच, खेल देशपांडे येथे ११ सदस्य अविरोध निवडून आले. नरसीपूर येथे तीन, पिवंदळ खुर्द येथे एक, थार येथे दाेन सदस्य अविरोध निवडून आले आहेत. तुदगाव येथे चार, तर ईसापूर येथे एक, वाडी अदमपूर येथे तीन, वांगरगाव येथे सहा, तळेगाव वडनेरमधून एक, वडगाव रोठे येथे सहा सदस्यांची अविराेध निवड निश्चित झाली आहे. यामध्ये खेल सटवाजी व चांगलवाडी या दाेन ग्रामपंचायतींची अविरोध निवड निश्चित झाली आहे.
तेल्हारा तालुक्यात दोन ग्रामपंचायतींसह ८५ उमेदवार अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:14 AM