शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
2
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
3
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
5
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
7
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
8
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
9
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
10
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
11
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
12
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
13
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
14
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
15
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
16
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
17
दो भाई दोनों तबाही! शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची भन्नाट कॉमेडी; चाहत्यांना हसू आवरेना
18
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
19
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
20
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत

अकोटात ८५० किलो मांस जप्त, पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 5:03 PM

अकोट : स्थानिक शौकत अली चौकातील कुरेशी पुऱ्यात अकोट शहर पोलिसांनी रविवारी पहाटे धाड टाकून ८५० किलो मांस व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

अकोट : स्थानिक शौकत अली चौकातील कुरेशी पुऱ्यात अकोट शहर पोलिसांनी रविवारी पहाटे धाड टाकून ८५० किलो मांस व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. पाचही आरोपींना न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे अकोट शहरात खळबळ उडाली आहे.अकोट शहरातील कुरेशी पुरा येथे गुरांची अवैध कत्तल करण्यात येत असल्याची माहिती अकोट शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी २८ आॅक्टोबर रोजी धाड टाकली. यावेळी पाच जणांकडे अवैध मांस असल्याचे आळल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली.आरोपींमध्ये वसीम अहमद जहुर अहमद (२०) रा.कुरेशी पुरा, जावेद अहमद खाजा मिया (३०) रा,आंबोळीवेस, तौफिक अहमद अब्दुल हाफिज (२१) रा. कुरेशीपुरा, अब्दुल रशीद अब्दुल हबीब (५२), रा. आंबोळी वेस , इरफान अहमद अब्दुल मजीद (३५), कुरेशीपुरा आदींचा समावेश आहे. या आरोपींकडून पोलिसांनी सात कुºहाडी, सात सुरे व ८५० किलो गोवंश मास एकत्रीत किंमत एक लाख ७० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात साहाय्यक पोलिस निरीक्षक दयनोबा फड, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश पाटील, हेड कॉन्स्टेबल संजय घायल, शिंदे, पोलिस कर्मचारी अघडते, पठाण, वीरेंद्र लाड, सोळंके, बेले, नरवाडे, चिंचोळकर व महिला कर्मचारी गीता यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस