अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी रासायनिक खताचा पुरवठा सुरू करण्यात आला असून अकोल्याला ८,५०० मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे.खत घेऊन येणारे रॅक अकोल्यात पोहोचली आहे .कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात टाळा बंदी घोषित करण्यात आली आहे .त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद आहे .परंतु शेती कृषी निविष्ठा ,रासायनिक खते ,कीटकनाशके औषधे ,ने आणण्यास परवानगी देण्यात आली आहे ,याच अनुषंगाने येत्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खते देण्याचा पुरवठा करण्यात येत आहे .मागील आठवड्यात मलकापूर येथे हाताचा साठा पोचला होता .तसेच धामणगाव येथेही रासायनिक खताचा साठा घेऊन येणारी रॅक पोचली होती आठवड्यात या कामाला गती देण्यात आली असून ,बुलढाणा जिल्'ातील खामगाव येथे दोन रासायनिक खतांच्या रॅक पोचले आहेत बुलढाणा जिल्'ात आतापर्यंत १२,५०० मॅट्रिक टन खताचा साठा पोचला आहे लवकरच बडनेरा येथे खताचा साठा घेऊन येणारीरॅक पोचणार आहेअकोला जिल्'ात खताच्या साठ्याचा तुटवडा भासू नये म्हणून यावर्षी आतापर्यंत ८,५०० मेट्रिक टन रासायनिक खताचा साठा पोचला आहे ;लवकरच उर्वरित पुरवठा केला जाणार आहे .वाशीम येथेही लवकरच खताचा पुरवठा करण्यात येणार आहे.टाळा बंदी मुळे शेतकऱ्यांना अडचण भासू नये याची खबरदारी शासन व कृषी विभाग स्तरावर घेतली जात आहे , यानंतर लवकरच बियाणे पुरवठ्याचे नियोजन केले जाणार असून ,ते शेतकºयांना लवकरच मिळणार आहे ,शेतीकामासाठी कोणतीही अडचण नसून शेतकºयांनी मशागतीचे कामे करावे .परंतु त्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे .सध्यातरी आरसीएफ आणि इफको चा रासायनिक खताचा पुरवठा केला जात आहे .अशी माहिती अमरावती विभाग कृषी विभागाचे सहसंचालक सुभाष नागरे यांनी दिली.
अकोल्यात ८,५०० मेट्रीक टन खत पोहोचले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 4:39 PM