अकाेला : शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात २३ नाेव्हेंबरपासून नियमांचे पालन करीत, इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी केवळ १० टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळांमध्ये दिसून आली; मात्र आता शाळा हळूहळू गजबजत आहे. गेल्या आठवड्यात ८ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर जिल्ह्यातील ५३८ शाळांपैकी ४६३ उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाने शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थी व शिक्षक थर्मल स्कॅनिंग करण्यासोबतच इतर सुविधा उपलब्ध करण्यास बजावले होते. त्यानुसार सोमवारी विद्यार्थी व शिक्षकांची तपासणी करून शाळेत प्रवेश देण्यात आला. शाळांमध्ये सध्या महत्त्वाचे इंग्रजी, गणित व विज्ञान विषयाच्या तासिका घेण्यात येत आहेत. उर्वरित विषयाच्या तासिका ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, शिक्षण यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत अजूनही काही पालक संभ्रमावस्थेत असल्याने शाळांमधील उपस्थितीचा टक्का हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे.
संमतीपत्र कमीच!
वर्ग ९ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू केले असले तरी पालकांनी संमतीपत्र दिल्यानंतरच पाल्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ११ हजार १४१ पालकांनीच संमतीपत्र भरून दिले असून, पाल्यांना शाळेत पाठविले जात आहे.
काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची पूर्ण दक्षता घेऊन शाळा सुरू आहेत. पालकांनी हवे तर प्रत्यक्ष पाहणी करून पाल्यांना शाळेत पाठवावे.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी
३४९३ ४०