अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासन सर्व शिधापत्रिकाधारकांची माहिती संगणकीकृत करीत आहे. या प्रक्रियेत शिधापत्रिका आधार क्रमांकासोबत जोडली जात आहे. अमरावती विभागात आधार संलग्नीकरण पूर्णत्वाकडे जात असून, ८७ टक्के शिधापत्रिका आधार संलग्नित झाल्या आहेत. आधार संलग्नीकरणानंतर लाभार्थींना बायोमेट्रिक शिधापत्रिका दिली जात आहे. अकोला जिल्ह्यातील २ लाख १४ हजार ८६५ शिधापत्रिकांमध्ये २२ लाख ३७ हजार ९३९ सदस्य आहेत. यातील ९ लाख ४४ हजार ५८३ सदस्यांची नोंदणी झालेली आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधारकार्डशी जोडल्या जात आहे. यामुळे राज्यातील बनावट शिधापत्रिका, शिधावाटप दुकानांच्या अन्नधान्य वितरणाच्या बाबतीतील तक्रारी, अपात्र लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळणे दूर होतील. अशा सर्व प्रकारांना पायबंद घालण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पूर्णत: संगणकीकरण उपयुक्त ठरेल.अकोला जिल्ह्यातील २ लाख १४ हजार ८६५ शिधापत्रिकांमध्ये ११ लाख ३७ हजार ९३९ सदस्य आहेत. यातील ९ लाख ४४ हजार ५८३ सदस्यांची नोंदणी झालेली आहे.वाशिम जिल्ह्यात सहा लाख ७१ हजार ८७९ सदस्यांसाठी १ लाख ५१ हजार ५७७ शिधापत्रिका आहेत. यातील ८६ टक्के सदस्यांचे सिडिंग पूर्ण झाले असून, यात पाच लाख ७८ हजार ४९७ सदस्यांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शिधापत्रिका ३ लाख ८२ हजार ९२३ आहे. यातील १९ लाख ३१ हजार २८९ सदस्यांपैकी १७ लाख २० हजार ४८१ सदस्यांची म्हणजेच ८९.०८ टक्के आधार संलग्नीकरण करण्यात आले आहे.अमरावती जिल्ह्यात १८ लाख ८ हजार ७३६ सदस्यांकडे ३ लाख ८१ हजार १५१ शिधापत्रिका आहेत. यातील १५ लाख ८४ हजार ९१२ लाभार्थींचे सिडिंग पूर्ण झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ३ लाख ६१ हजार १४८ शिधापत्रिकांमध्ये १८ लाख २४ हजार २८१ सदस्यांपैकी १६ लाख ९ हजार ७२० सदस्यांचे आधार क्रमांक जोडण्यातआले आहे. ८८.२३ टक्क्यांसह बुलडाणा दुसºया क्रमांकावर आहे.९ लाख ३५ हजार शिधापत्रिकांचे संलग्नीकरण बाकीविभागात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत १४ लाख ९१ हजार ६६४ शिधापत्रिका आहे. यात ७३ लाख ७४ हजार १२४लाभार्थी आहेत. यापैकी ८७.३१ टक्के म्हणजेच ६४ लाख ३८ हजार १९३ लाभार्थींची आधार सिडिंग करण्यात आलेआहे. उर्वरित ९ लाख ३५ हजार ९३१ लाभार्थींचे संलग्नीकरण अद्याप झालेले नाही.
अमरावती विभागात शिधापत्रिका आधार संलग्नीकरणाचे काम पूर्णत्वाकडे,८७ टक्के शिधापत्रिका झाल्या आधार संलग्नित
By atul.jaiswal | Published: November 14, 2017 1:28 PM
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासन सर्व शिधापत्रिकाधारकांची माहिती संगणकीकृत करीत आहे. या प्रक्रियेत शिधापत्रिका आधार क्रमांकासोबत जोडली जात आहे. अमरावती विभागात आधार संलग्नीकरण पूर्णत्वाकडे जात असून, ८७ टक्के शिधापत्रिका आधार संलग्नित झाल्या आहेत. आधार संलग्नीकरणानंतर लाभार्थींना बायोमेट्रिक शिधापत्रिका दिली जात आहे. अकोला जिल्ह्यातील २ लाख १४ हजार ८६५ ...
ठळक मुद्देअकोला जिल्ह्यात ९ लाख ४४ हजार ५८३ आधार नोंदणी८८.२३ टक्क्यांसह बुलडाणा दुसºया क्रमांकावर आहे.