अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये तातडीने मदत देण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची ९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. पाच प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, २ प्रकरणांमध्ये फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकूण १६ शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी शेतकरी आत्महत्यांची ९ प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातल्या गौलखेडी येथील महादेव मनू राठोड, मंगरुळ कांबे येथील भानुदास सीताराम डिके, बाश्रीटाकळी तालुक्यातील पुनोती बु. येथील बाळकृष्ण श्रीराम खंडारे, जांभरुण येथील महादेव परशराम नांदे, आकोट तालुक्यातल्या मंचनपूर येथील गजानन दादाराव चौधरी, अकोला तालुक्यातील सांगळूद येथील संदीप महादेव सिरसाट, तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथील विजयसिंग श्रीपत सोळंके, पाथर्डी येथील मंगल वासुदेव लुटे व मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा येथील श्रीकृष्ण वासुदेव नाचणे आदी ९ शेतकरी आत्महत्या प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. उर्वरित ५ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, २ शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या या बैठकीला समितीचे सदस्य जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, शिवाजीराव देशमुख यांच्यासह पोलीस अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे प्रतिनिधी अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी आत्महत्यांची ९ प्रकरणे मदतीसाठी पात्र
By admin | Published: September 22, 2015 1:36 AM