दुकाने उघडणाऱ्या व दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही स्थानिक प्रशासनाने दिला आहे. चान्नी येथे २६ फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश गाडगे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये ११४ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी नऊ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, आरोग्य पथकाद्वारे मंगळवारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. पॉझिटिव्ह आलेल्या नऊ जणांना होन क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या ३० ते ४० जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. आरोग्य पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी गणेश लोखंडे, आरोग्यसेवक अभिजीत थोरवे, आरोग्यसेविका अनिता चोरमारे, डॉ.फौजिया शेख, आशासेविका कल्पना संतोष ताले, लता विलास इंगोले, पुष्पा जगन्नाथ गाडगे यांचा समावेश आहे.
९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी गावातील व बस स्थानकावरील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सूचनेचे पालन न करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- चंद्रकांत तायडे, सरपंच चान्नी