अकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख २९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असला तरी, ९ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कर्जमाफी जाहीर होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला; मात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे वास्तव आहे.सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या राज्यातील शेतकºयांना दिलासा देण्यासाठी गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी घोषित करण्यात आली. त्यानुषंगाने कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यातील १ लाख २९ हजार शेतकºयांना ५५२ कोटी ४२ लाख ७१ हजार रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, उर्वरित ९ हजार शेतकºयांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी, जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.कर्जमाफीचे असे आहे वास्तव!
- -कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेले शेतकरी : १ लाख ३८ हजार.
- -कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी : १ लाख २९ हजार.
- -शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा केलेली रक्कम : ५५२.४२ कोटी ७१ हजार रुपये
- -कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी : ९ हजार.
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात आॅनलाइन अर्ज केलेल्या १ लाख ३८ हजार शेतकºयांपैकी डिसेंबर अखेरपर्यंत १ लाख २९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.-जी.जी. मावळेजिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)