आधुनिक पद्धतीने शेती करताना पीक लागवडीचा खर्च माेठ्या प्रमाणात वाढला आहे. एवढा पैसा शेतकऱ्याजवळ राहत नसल्याने सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नव्हता. अनेक शेतकरी सावकाराकडून लुबाडले जात हाेते. शेतीत पिकलेले उत्पन्न सावकारालाच द्यावे लागत हाेते. ही बाब ओळखून शासनाने शेतकऱ्यांना बँकांनी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बँकेला पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टही देण्यात आले आहे. यावर्षी बँकांनी उद्दिष्टाच्या ७२ टक्के कर्ज वितरण केले आहे.
गतवर्षी ७४ टक्के पीककर्ज वाटप
मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ४३४ शेतकऱ्यांना ८४६ कोटी १० लाख रुपये पीककर्जाचे वितरण करण्यात आले होते. उद्दिष्टाच्या ७४ टक्के पीककर्ज वाटप झाले होते.
बँकनिहाय कर्जवाटप
सार्वजनिक क्षेत्रातील बँक
२५२ कोटी ४३ लाख
खासगी क्षेत्रातील बँक
१२ कोटी ०६ लाख
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
४९४ कोटी ३५ लाख
विदर्भ कोकण ग्रामीण बँक
१०६ कोटी ४४ लाख
खासगी, सार्वजनिक बँकांना वावडे
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका मिळून ५९ हजार २०० शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्ज वितरण करावयाचे असताना ३१ ऑगस्टपर्यंत केवळ २५ हजार ५९८ शेतकऱ्यांना २६४ काेटी ४९ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे. खासगी क्षेत्रातील बँकेकडून निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ २२ टक्के तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ५७ टक्के कर्ज वितरण झाले. अर्थात, पीककर्ज वितरणाचे या बँकांना वावडे असल्याचे दिसते.