रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, करडई अशा विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. या पिकाची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांश शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन हंगामाचे नियोजन करतात. बँकांच्या क्लिष्ट अटी व कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. पीक घेण्यासाठी आर्थिक तडजोड आवश्यक असल्याने या अटींची पूर्तता करावी लागत आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात ७४ टक्के कर्जवाटप झाले होते. यावेळी सुमारे १ लाख ६ हजार ४३४ शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले. तर रब्बी हंगामात ६ हजार ५०० शेतकऱ्यांना ६० कोटी रुपये वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यातील ६ हजार १६२ शेतकऱ्यांना ५८ कोटी ६९ लाख ८१ हजार रुपये कर्ज वाटप झाले. पीक कर्ज घेणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे.
--बॉक्स--
बँकांकडून झालेले कर्जवाटप
सार्वजनिक क्षेत्रातील बँक
३८ कोटी ७३ लाख ९५ हजार रुपये
खासगी क्षेत्रातील बँक
११ कोटी ८३ लाख ९५ हजार रुपये
विदर्भ कोकण ग्रामीण बँक
७ कोटी १२ लाख ४२ हजार रुपये
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
९९ लाख ८८ हजार रुपये
--कोट--
उद्दिष्टाच्या ८२ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झाले. येत्या खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत मिळण्याचे नियोजन आहे.
आलोक तारेनिया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक