सचिन राऊत, अकोला: सिटी कोतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील भाजी बाजारातून जात असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाकडील ४० हजार रुपये असलेली बॅग अज्ञात चाेरटयांनी लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी सिटी काेतवाली पाेलिसांकडे तक्रार देण्यात आली असून पाेलिसांनी चाैकशी सुरु केली आहे.
एक ६५ वर्षीय वृध्दाने नातवांच्या शाळेच्या शुल्कासह कापड व पुस्तके घेण्यासाठी ४० हजार रुपयांची रक्कम काढली हाेती. त्यानंतर ही रक्कम घेउन जात असतांना भाजी बाजार परिसरात अज्ञात चाेरटयांनी त्यांच्यावर पाळत ठेउन त्यांच्याकडील बॅग पळवीली. वृध्द भाजी घेत असतांनाच त्याच्याकडील बॅग पळविल्याचे त्यांनी सिटी काेतवाली पाेलिसांना सांगीतले. सिटी काेतवाली पाेलिसांनी या प्रकरणाची चाैकशी सुरु केली असून चाेरटयास अटक करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी सांगीतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चाेरटयांचा शाेध घेण्यात येत आहे.