अकाेला: दराेडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात जणांना वाडेगावात नाकाबंदी करुन अटक करण्याची कारवाइ गुरुवारी सायंकाळी बाळापूरचे उपविभागीय पाेलिस अधिकारी तथा सहाय्यक पाेलिस अधीक्षक गाेकूल राज यांच्या पथकाने केली. आराेपींकडून देशी बनावटीच्या एका पिस्तूलसह सात जिवंत काडतूस व दराेड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यातील चार आराेपी हिंगाेली जिल्ह्यातील व तीन आराेपी वाशिम जिल्ह्यातील आहेत.
राहुल भगवान खिल्लारे (२६ रा.शाहूनगर हिंगोली), ऋतिक कल्यानराव वाढवे (२१ रा. पिंपळखेड जि. हिंगोली), सुर्यकिरण बळीराम चोरमल (२३ रा. इसापूर रमना, ता. जि. हिंगोली), सुमित शेषराव पुंडगे (२२ रा. पिंपळखेड जि. हिंगोली),अंकुश रमेश कंकाळ (२२रा.सावरगाव (बडी) ता. जि. वाशिम), नितेश मधुकर राऊत (३५रा. जांभरूण जहाँगीर ता. जि. वाशिम), देवानंद अमृता इंगोले (२६रा. सावळी ता.जि.वाशिम) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथून काही संशयास्पद इसम पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एमएच-३७ एडी-३४९० ने बाळापूरकडे निघाले असून त्यांच्याकडे बंदूकीसह इतरही आक्षेपार्ह साहित्य असल्याची गुप्त माहिती बाळापूरचे सहाय्यक पाेलिस अधीक्षक गाेकूल राज यांना मिळाली.
ही कार वाडेगावात पाेहाेचण्याच्या बेतात असल्याने गाेकूल राज यांनी वाडेगाव गाठत मुख्य रस्त्यावर नाकाबंदी केली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाेलिसांनी या कारला थांबवले असता, त्यामध्ये सात इसम आढळून आले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता राहुल भगवान खिल्लारे याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल व सात जिवंत काडतुस जप्त केले. ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह, सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गाेकूल राज यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूरचे पाेलिस निरीक्षक अनिल जुमळे, ‘एपीआय’पंकज कांबळे यांच्यासह बाळापूर व वाडेगावातील पाेलिस कर्मचाऱ्यांनी केली.
दराेड्याच्या प्रयत्नातील सातपैकी चार जण सराइत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून एका पिस्तूलसह लाल तिखट पावडर, दोरी, टॉर्च, एक चाकू आदी साहित्य जप्त केले असून त्यांच्या विरुध्द भादंवि व आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.-गाेकूल राज सहायक पाेलिस अधीक्षक तथा ‘एसडीपीओ’,बाळापूर