सचिन राऊत, अकोला: जठारपेठ चौकातील चाइल्ड अँड ब्युटी केअर होमिओपॅथिक क्लिनिकचा संचालक डॉ प्रवीण अग्रवाल याच्या विरोधात सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात एका रुग्ण महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राऊतवाडी परिसरातील रहिवासी ३० वर्षीय महिला डॉ प्रवीण अग्रवाल रा. जठारपेठ याच्या चाइल्ड अँड ब्युटी केअर होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये चेहऱ्यावर आलेले वांग कमी करण्यासाठी मागील सहा महीन्यांपासून उपचार घेत होत्या. २ मे रोजी रात्री ८ वाजता तपासणीसाठी गेल्या असता डॉ प्रवीण अग्रवाल याने केबिनमध्ये बोलावून त्याचे खुर्चीला लागून असलेल्या टेबल जवळील खुर्चीवर महिलेला बसवून नको त्या ठिकाणी हात लावून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
महिलेने हात झटकला असता आरोपी याने पुन्हा दुसऱ्या ठिकाणी हात लावून विनयभंग केला. आरोपी डॉ अग्रवाल याचे कृत्य बघून महिला दवाखान्या बाहेर निघून गेली व झालेला प्रकार तिच्या मावस भावाला सांगितला. महिलेच्या भावाने या संदर्भात डॉक्टर अग्रवालला विचारना केली असता आरोपी डॉक्टर प्रवीण अग्रवाल याने माफी मागितली. मात्र फिर्यादी महिलेने आरोपी डॉक्टर हा मागील सहा महिन्यापासून अशाच प्रकारे वागणूक देत असल्याचे सांगितल्यानंतर या प्रकरणाची तक्रार सिविल लाईन्स पोलीस ठाण्यात देण्यात आली. यावरून सिविल लाईन्स पोलिसांनी आरोपी डॉ अग्रवाल याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सिव्हील लाइन्स पाेलिस स्टेशनचे पाेलिस उपनिरीक्षक संदिप बालाेद करीत आहेत.
पाेलिसांनी महिलेला ठेवले ताटकळत
या प्रकरणातील आराेपी डाॅ प्रवीण अग्रवाल याला वाचविण्यासाठी सिव्हील लाइन्स पाेलिसांनी महिलेला ताटकळत ठेवले. तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. त्यामूळे या प्रकरणात सिव्हील लाइन्स पाेलिसांवरही कारवाइ करण्याची मागणी हाेत आहे. एका प्रतीष्ठीत घरातील महिलेला अशा प्रकारे वागणुक देणाऱ्या डाॅ. अग्रवाल याला पाठीशी घालणाऱ्या पाेलिसांचीही वरीष्ठ स्तरावरुन चाैकशी करण्याची मागणी महिलेच्या नातेवाइकांनी केली आहे.