अकोला: कत्तल करण्याच्या उद्देशाने शिवनी येथून मालवाहू वाहनांमध्ये निर्दय देणे बैल जोडीला डांबून नेत असताना पोलिसांनी रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास जनता भाजी बाजार येथे नाकाबंदी करून वाहन पकडले. वाहनातील बैलजोडीची सुटका केली.
पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना रविवारी सकाळी शिवणी येथून एका मालवाहू वाहनांमध्ये दोन बैलांना दाबून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी व त्यांच्या पथकाने जनता भाजी बाजार येथे नाकाबंदी करून एम एच 20 एलएल 50 15 क्रमांकाचे मालवाहू वाहन पकडले. मनातून बैलांची सुटका करी त्यांना जीवनदान दिले. पोलिसांनी शिवनी येथील आरोपी विकास लक्ष्मण लव्हारे (30) याला अटक केली आहे. पोलिसांनी नव्वद हजार रुपये किमतीची बैल जोडी व पाच लाखाचे वाहन असा एकूण पाच लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तब्येत घेतलेल्या बैलांना म्हैसपूर येथील आदर्श गोरक्षण संस्थेकडे स्वाधीन केले आहे.या प्रकरणात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खदान नाक्यावरून दोन क्विंटल गोमास जप्त
बार्शीटाकळी येथून गुरांची कत्तल करून दोन क्विंटल गोमांस अकोला शहरातील खदान भागात येत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना रविवारी सकाळी मिळाली. त्यांनी खदान नाक्यावर नाकाबंदी करून एमएच 30 पी 75 41 क्रमांकाचा ॲपे ऑटो रिक्षा पकडला. या रिक्षात दोन क्विंटल प्रतिबंधित गोमांस आढळून आले. पोलिसांनी गोमांस जप्त करून बार्शीटाकळी येथील आरोपी जमशेद खान जाफर खान, शेख रहमान शेख अजीज दोघांना अटक केली.त्यांच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.