-संजय उमक मूर्तिजापूर : दर्यापूर रोडवरील पुंडलिक नगर परिसरात सिरसो येथे एका शेतातील झाडावर दुर्मिळ असलेला वन्य जीव मसन्या उद त्याच्या तीन पिल्लांसह २५ जुलै रोजी आढळून आला. या मसन्या उदाचा त्याच्या परिवारासह दिवसभर एकाच झाडावर मुक्काम होता. अत्यंत दुर्मिळ असलेला व अलिकडे कुठेही न आढळणारा मसन्या उद २५ जुलै रोजी सिरसो येथील पुंडलिक नगर परिसरात असलेल्या भूषण ठाकूर यांच्या शेतातील एका बोरीच्या झाडावर आपल्या तीन पिल्लांसह मसन्या उद (उदमांजर) हा वन्य जीव आढळून आला आहे. कधीही न आढळणारा मसन्या उद दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मसन्या उद हा निशाचर असून, तो बहूदा झाडावर वास्तव्य करतो. मसन्या उडदाच्या जगात १३ प्रजापती असल्याचे मानल्या जाते. मसन्या उद हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहेत. याचा रंग काळसर असतो. याच्या अंगावर काळे जाड केस असतात. दात आणि नखे तिक्ष्ण असतात, त्याच्या शरीराइतकीच त्याची शेपटी सुद्धा लांब असते. त्याचा जीवन काळ १६ वर्षाचा आहे. हा दुर्मिळ वन्य जीव बहूदा स्मशानाच्या आसपास आढळून येतो. याची त्याच्या अंगावरील केस व मांसासाठी शिकार केल्या जात असल्याची माहिती आहे.-------------------------मसन्याउद किंवा उदमांजर हा वन्यजीव निसर्ग स्वच्छता दुत आहे . तो जास्तीत जास्त स्मशान भूमित किंवा आजु बाजुने आढळून येतो. मासांचे टुकडे वगैरे खावून उपजिविका करतात. हा प्राणी सहसा झाडा राहतो. असा प्राणी दिसला तर घाबरुन जाण्याचे कारण नाही. मानवावर स्वतःहून हल्ला करत नाहीत. - बाळ काळणे, सर्पमित्र तथा मानद वन्यजिव रक्षक, वनविभाग अकोला
मूर्तिजापूरात आढळला दुर्मिळ मसन्या उद व त्याची तीन पिल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 6:29 PM