तेल्हारा: ‘वान’चे पाणी तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करावे, खरीप हंगामाची आणेवारी ठरवून शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधी, पीकविम्याचा लाभ द्यावा, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिवसा वीज पुरवठा करावा, रस्त्याची दुरुस्ती करावी, यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी युवाशक्ती संघटनेच्यावतीने तेल्हाऱ्यात आक्रोश मोर्चा व शेगाव नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती युवाशक्ती संघटनेचे भवानी प्रताप यांनी बुधवार, २ डिसेंबरला आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
तालुक्यातील विवीध समस्या निर्माण झाल्याने युवाशक्ती संघटनेच्यावतीने दिवाळीच्या दिवशी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. अद्यापही मागण्या प्रलंबितच आहेत. ‘वान’चे पाणी तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करावे, खरीप हंगामाची आणेवारी ठरवून शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधी, पीकविम्याचा लाभ द्यावा, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिवसा वीज पुरवठा करावा, रस्त्याची दुरुस्ती करावी यांसह विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरला आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाने योग्य दखल न घेतल्यास होणारे आंदोलन तीव्र करू, तसेच सर्व प्रकारास शासन, प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा युवाशक्ती संघटनेच्यावतीने स्थानिक माहेश्वरी भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.