कलकत्ता ढाबा येथील रहिवासी बालाजी शेषराव पाटील (रा. मांडणी) हा कलकत्ता ढाब्याला लागूनच असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरवरून अमली पदार्थांची माेठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली़ या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून पाटील याच्याजवळ असलेल्या पाेतड्यातून अफूची बोन्ड व अफूची पावडर आणि एक तलवार (कत्ता) जप्त केली. यासाेबतच माेबाईल व वादग्रस्त साहित्य जप्त करण्यात आले असून, हा मुद्देमाल एक लाख रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे़ या आराेपीविरुद्ध बाळापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राउत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली़
अमली पदार्थाची उलाढाल वाढली
जिल्ह्यात विविध अमली पदार्थांची माेठ्या प्रमाणात विक्री हाेत असल्याचे विशेष पथकाने केलेल्या कारवाईवरून समाेर आले आहे़ गांजा, दारू तसेच विविध अमली पदार्थ विक्री हाेत असतानाच आता कलकत्ता ढाब्याजवळून चक्क अफूची फुले व पावडर जप्त केल्याने अमली पदार्थांची उलाढाल माेठ्या प्रमाणात वाढल्याचे वास्तव आहे़