राजरत्न सिरसाट, अकोला: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता पासून सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजता पर्यंत राज्यात एकूण आठ मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात १८.३३/टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता पासून सुरुवात झाली असून, दुपारच्या उन्हाचा तडाका पाहता मतदारांनी सकाळपासूनच मतदारसंघावर रांगा लावायला सुरुवात केली आहे. अकरा वाजेपर्यंत सर्वच मतदार संघाची रांगच रांग होती.
दुसऱ्या टप्प्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ -वाशिम, बुलढाणा, वर्धा ,नांदेड, परभणी व हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
सकाळी नऊ वाजता पर्यंत अकोला लोकसभा मतदारसंघात १७.३७ टक्के मतदान झाले असून, अमरावती लोकसभा मतदारसंघात १७.७३, यवतमाळ- वाशिम मतदार संघात १८.०१, बुलढाणा लोकसभा मतदारसंघात १७. ९२, वर्धा लोकसभा मतदारसंघात १८.३५ ,नांदेड लोकसभा मतदारसंघात २०.८५, परभणी लोकसभा मतदारसंघात २१.७७ तर हिंगोली मतदारसंघात १८.१९टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील या आठ लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.३३ टक्के मतदान झाले असून विदर्भात आता तापमान तापू लागले आहे . अकोला लोकसभा मतदारसंघातही आकाश निरभ्र झाले असून ढगाळ वातान निवडले आहे आणि तापमानाचा पारा चढत आहे. पण मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढतच आहे आहे.पश्चिम विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघात मतदानाला वेग आला आहे.