प्रशांत विखे
तालुका कृषी कार्यालतील तब्बल ५० टक्के पदे रिक्त असल्याने विविध योजनाची अंमलबजावणीकरिता अडचणी निर्माण होत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे
तालुका कृषी कार्यालयामार्फत संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना शासन राबवित असते तसेच शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी त्याबाबत त्यांना लागणारे मार्गदर्शन सुद्धा याच विभागातील कर्मचारी वर्गाकडून शेतकऱ्यांना होत असते आज रोजी निसर्गाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत असून, शेतकरी अनेक वर्षांपासून सतत हवालदिल होत असून, या ना त्या कारणाने शेतकऱ्यांच्या हातून एकामागून एक हंगाम निघून जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे अशा परिस्थितीत त्याला शासनाच्या विविध योजना व मार्गदर्शन मिळण्याची आवश्यक असताना त्या कार्यालयातील ५० टक्के कर्मचारी पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही
जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुनलेत सर्वांत जास्त पदे ही तेल्हारा तालुक्यातील रिक्त असण्यामागे म्हणजे अनेक कर्मचारी हे जिल्हाच्या ठिकाण जवळ राहणे पसंत करीत असल्याने अनेक कर्मचारी हे ‘सेटिंग’ लावून तेल्हारा ठिकाण टाळत असल्याची चर्चा आहे, मात्र वरिष्ठ अधिकारी यांनी त्याला थारा न देता सर्वसमान कार्यक्रमानुसार कर्मचारीची नियुक्ती करून तालुक्यावर होत असलेला अन्याय दूर करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
अशी आहेत रिक्त पदे
एकूण मंजूर पदे ६७
एकूण भरलेली पदे ३५
एकूण रिक्त पदे ३२
रिक्त पदांमध्ये
मंडळ कृषी अधिकारी १
कृषी पर्यवेक्षक ६
लिपिक ४
अनुरेखक ५
कृषी सहायक १२
शिपाई ४