नितीन गव्हाळे, अकोला: रा. स्व. संघाचे प्रचारक दत्ताजी डिडोळकर व बलराज मुधोक, दत्तोपंत ठेंगडी यांनी विद्यार्थी शक्तीला एकत्र आणण्यासाठी अभाविपची स्थापना केली. आज विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना राष्ट्रकार्याशी जोडून क्रियाशील ठेवण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे अभाविप ही विद्यार्थ्यांची जगातील सर्वात मोठी संघटना आहे, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद केंद्राचे पूर्व पूर्णवेळ कार्यकर्ते दिलीप महाजन (मुंबई) यांनी केले. डाबकी रोडवरील खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या सभागृहात मंगळवार ९ जुलै रोजी आयोजित अभाविपचा स्थापना दिन व पूर्व कार्यकर्ता संमेलनात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष निकेश गुप्ता होते. प्रमुख अतिथी म्हणून अभाविपचे पूर्व प्रांताध्यक्ष प्रा. प्रशांत देशमुख, कार्यक्रम प्रमुख समीर गडकरी, महेंद्र कविश्वर, दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे जिल्हा संयोजक प्रा. उमेश कुळमेथे उपस्थित होते.यावेळी दिलीप महाजन यांनी, दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यकर्त्यांनी कसं काम करावं याचा आदर्शच दत्ताजी डिडोळकर यांनी घालून दिला. नागपुरातून त्यांना मद्रास प्रांत संघाचे प्रचारक म्हणून पाठविण्यात आले. तेथे भाषेची अडचण होती. परंतु त्यांनी तमिळ, मल्याळम भाषा अवगतच केली नाहीतर त्यावर प्रभुत्व मिळविले. विरोधकांनासुद्धा त्यांनी आपलेसे केले. अभाविपच्या स्थापनेसोबतच कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाच्या स्थापनेतसुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचेही दिलीप महाजन यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर गडकरी यांनी केले. संचालन जान्हवी नाईक हिने केले तर आभार प्रा. उमेश कुळमेथे यांनी मानले. वैयक्तिक गीत आशिष मालशे यांनी म्हटले. कार्यक्रमाला विभाग संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे, कृष्णा शर्मा, माजी महापौर अश्विनी हातवळणे, पल्लवी कुळकर्णी, डॉ. अशोक ओळंबे, प्रा. नितीन बाठे, सचिन जोशी, रामप्रकाश मिश्रा आदी उपस्थित होते.फोटो: ....................................पूर्व कार्यकर्त्यांचा यथाेचित सन्मानअभाविपचे काम करून विस्तार करणाऱ्या पूर्व कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला. अकोला अर्बन बॅंकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, राजाभाऊ भांडारकर, प्रा. रमेश देशपांडे, महेंद्र कविश्वर यांना शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोबतच विभाग संघटनमंत्री योगेश शेळके यांचे केंद्र अमरावती येथे तर काटोल येथील नयन साेलंकी यांची अकोला जिल्हा संघटनमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने, त्यांचाही सन्मान करण्यात आला.