अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात होत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर जास्त प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारे झोननिहाय सुरू आलेल्या कोविड चाचणी केंद्रांव्दारे आणि फिरते कोविड चाचणी केंद्राव्दारे संदिग्ध रुग्णांच्या तपासणीला वेग आला आहे रविवारी संध्याकाळपर्यंत शहरातील एकूण ९६५ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
पूर्व झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ९५ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड अँटिजन चाचणीसाठी एकूण १०१ स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून २३ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि ७८ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पश्चिम झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ३७ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड अँटिजन चाचणीसाठी एकूण २०० स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून ९ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि १९१ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उत्तर झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १२४ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड अँटिजन चाचणीसाठी १०३ स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून ८ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि ९५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तसेच दक्षिण झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ६५ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड अँटिजन चाचणीसाठी ६५ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यामधून 3 नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अणि ६२ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच फिरते पथक उत्तर झोन अंतर्गत रॅपिड अँटिजन चाचणीसाठी ९५ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहे. यामधून १० नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि ८५ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तसेच फिरते पथक पश्चिम झोन अंतर्गत रॅपिड अँटिजन चाचणीसाठी ८० नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहे यामधून १ नागरिकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आणि ७९ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तसेच दि. ८ मे रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत ८९, पश्चिम झोन अंतर्गत २४, उत्तर झोन अंतर्गत ३७ आणि दक्षिण झोन अंतर्गत ५६ असे एकूण २०६ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.