मागील पाच दिवसांची स्थिती
तारीख - पहिला डोस - दुसरा डोस - एकूण लसीकरण
१४ सप्टेंबर - ४,७०७ - २,४५५ - ७,१६२
१५ सप्टेंबर - ७,२६८ - ३,४८८ - १०,७५६
१६ सप्टेंबर - ६,४१५ - ३,२८५ - ९,७००
१७ सप्टेंबर - ५,१८६ - ३,१५५ - ८,३४१
१८ सप्टेंबर - ९,५२५ - ६,४६२ - १५,९८७
दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमीच
लसीकरणाचा उच्चांक वाढत असला, तरी अनेक जण दुसरा डोस घेण्यास टाळत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. लस उपलब्ध होऊनही अनेक जण लस घेत नसल्याने दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे.
शनिवारी १५ हजारपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये मात्र काही प्रमाणात उदासीनता दिसून येत आहे. कोविडपासून बचावासाठी प्रत्येक नागरिकाने लस घेणे आवश्यक आहे.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला