शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

अकोला-पूर्णा रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला गती

By atul.jaiswal | Published: June 27, 2020 9:40 AM

अकोला ते शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकापर्यंत विद्युत खांब उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्देपूर्णा रेल्वेस्थानकापर्यंत विद्युतीकरण होणार आहे. २११ कोटीपेक्षा अधिक निधीची तरतूद आहे. २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात कमी अंतराचा व महत्त्वाच्या लोहमार्गावरील अकोला ते पूर्णा या २१० किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या विद्युतीकरणाला गती मिळाली असून, अकोला ते शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकापर्यंत विद्युत खांब उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. कामाची गती पाहता २०२१ पर्यंत हे काम पूर्णत्वास जाऊन या मार्गावर डिझेलऐवजी विजेवर चालणाारे रेल्वे इंजीन लवकरच धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दक्षिण-मध्य रेल्वेचा अकोला ते पूर्णा हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासी व मालवाहू गाड्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. देशभरातील लोहमार्गांचे विद्युतीकरण करण्याच्या रेल्वेच्या योजनेचा भाग म्हणून अकोला ते परभणी जिल्ह्यातील पूर्णा रेल्वेस्थानकापर्यंत विद्युतीकरण होणार आहे. या मार्गाच्या विद्युतीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाने २०१८ च्या अर्थसंकल्पात २११ कोटीपेक्षा अधिक निधीची तरतूद केली होती. त्यानंतर या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. रेल्वेच्या अलाहबादस्थित सेंट्रल आॅर्गनायझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनमार्फत रेल्वे विद्युतीकरणाचे काम केले जाते. या संस्थेने निविदा प्रक्रिया राबवून ‘केईसी’ या कंपनीला विद्युतीकरणाचे कंत्राट देत कार्यारंभ आदेश दिला आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून तीन वर्षांत हे काम पूर्ण करणे बंधनकारक असल्यामुळे केईसी कंपनीने युद्धपातळीवर विद्युतीकरणाचे काम हाती घेतले आहे. सदर कंपनीने देशात बऱ्याच ठिकाणी निश्चित कालावधीपेक्षा कमी वेळेत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करून दाखविले आहे. गत काही आठवड्यांपासून अकोला ते पूर्णादरम्यान विविध रेल्वेस्थानकांवर विद्युतीकरणाशी संबंधित साहित्य आणून ठेवले जात आहे. एवढेच नव्हे, तर अकोला ते शिवणी-शिवापूरदरम्यान अनेक ठिकाणी विद्युत खांब उभे झाले आहेत. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या कालावधीत झपाट्याने काम करण्यात आले आहे. कामाचा वेग बघू जाता वर्ष २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वेळ व इंधनाची होणार बचतदक्षिण भारतातून नांदेड-पूर्णा-अकोला मार्गे उत्तर भारतात जाणाºया प्रवासी व मालगाड्या हैदराबाद ते अकोलापर्यंत डिझेल इंजीनवर धावतात. अकोल्याहून पुढे विद्युतीकरण झालेले असल्याने अकोल्यात या गाड्यांना विजेवर चालणारे इंजीन जोडले जाते. यासाठी किमान अर्धा तास खर्ची पडतो. अकोला ते पूर्णा विद्युतीकरण झाल्यास दक्षिणेकडून येणाºया गाड्या थेट उत्तर भारतात विद्युत इंजीनवर धावतील. यामुळे डिझेलवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्चही वाचणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक