शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

अकोला-अकोट मार्गावर विटांनी भरलेला मिनी ट्रक उलटला; १ ठार, ४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 1:15 PM

अकोला : अकोटवरून अकोल्याकडे येत असलेला वीटांनी भरलेला मिनी ट्रक वल्लभनगरजवळ सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान उलटला. या भीषण अपघातात ट्रकमधील एक मजूर जागेवरच ठार झाले, तर ४ जण जखमी झाले.

ठळक मुद्देवाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झाला अपघात. ट्रकच्या कॅबिनचा झाला चुराडा.जखमींना उचारासाठी सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले.

अकोला : अकोटवरून अकोल्याकडे येत असलेला वीटांनी भरलेला मिनी ट्रक वल्लभनगरजवळ सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान उलटला. या भीषण अपघातात ट्रकमधील एक मजूर जागेवरच ठार झाले, तर ४ जण जखमी झाले. जखमींना उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रविंद्र मावस्कर (२४, रा. ढाकणा, ता. चिखलदरा, जि. अमरावती) असे मृतकाचे नाव आहे.विटांनी भरलेला एम.एच. ०४ एफ. पी. ६०४० क्रमांकाचा ४०७ मिनीट्रक अकोल्याच्या दिशेने येत असताना चालकाचे वल्लभनगरजवळ वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा मिनीट्रक रस्त्याच्याकडेला जाऊन उलटला. यावेळी ट्रकच्या ट्रॉलीमध्ये ४ मजूर बसलेले होते. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकच्या कॅबिनचा पार चुराडा झाला, तर ट्रॉलीमधील ४ मजूर विटांच्या ढीगाºयाखाली दबले. यामध्ये रविंद्र मावस्कर याचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले. घटनेची वार्ता पसरताच ग्राामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली व विटांच्या ढीगाºयात दबलेल्या मजुरांना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. जखमींमध्ये नवलासिंग ईटीया सावलकर (२०, रा. वेराटेक, धारणी), तुळशीराम जयराम कायडेकर (रा. गरडा मालीर , धारणी), श्याम इराजी दाराशिव (२०, रा. गरडा मालीर, धारणी) व सोनू जयसिंग वेटेकर (२०, रा. बिमोरी, धारणी) यांचा समावेश आहे. या अपघातामुळे अकोला-अकोट मार्गावरील वाहतुक काही वेळ विस्कळित झाली होती. दरम्यान, अपघात झाल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAccidentअपघात