शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

‘न्यू ईयर सेलिब्रेशन’ करून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 3:28 PM

गोरेगाव खु. (अकोला) : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी गावानजीकच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी होऊन घराकडे परतणाऱ्या  येथील शिरीष विश्वासराव तायडे या तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. रविवार, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला.

ठळक मुद्देयेथील शिरीष विश्वासराव तायडे या तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला.रविवार, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला.मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबला जाऊन धडकली.

गोरेगाव खु. (अकोला) : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी गावानजीकच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी होऊन घराकडे परतणाऱ्या  येथील शिरीष विश्वासराव तायडे या तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. रविवार, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला.अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द येथील काही तरुणांनी रविवार, ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त गावानजीकच्या शेतात पार्टी आयोजित केली होती. गावातीलच आदित्य तिडके यांच्या शेतात न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी रंगली. या पार्टीत शिरीष तायडे हा रत्नदिप तायडे व रोहन तायडे या आपल्या सैन्यातील मित्रांसोबत सहभागी होण्यासाठी मोटारसायकलवरून गेला. मध्यरात्रीपर्यंत पार्टी केल्यानंतर घराकडे परत येत असताना रत्नदिप मोटारसायकल चालवित होता. मन्साराम तिखिले यांच्या शेताजवळच्या वळणावर रत्नदिपचे नियंत्रण सुटले व मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबला जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये शिरीष तायडे हा जागीच मृत्यूमुखी पडला. या अपघातात रत्नदिप तायडे हा देखील जखमी झाला. यावेळी त्यांच्यासोबतच घरी परत येत असलेल्या इतर मित्रांनी शिरीष तायडे याला अकोला येथे रुग्णालयात आणले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिरीष हा विश्वास तायडे यांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAccidentअपघात