- नीलिमा शिंगणे-जगड ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संकटांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. ध्येय गाठायचे असेल तर अनेक अडथळे पार क रावे लागतात. आलेल्या संकटांवर मात करू न ध्येयप्राप्ती करावी, हेच प्रत्येक खेळाडूंच्या मनावर क्रीडा शिक्षक, प्रशिक्षकांकडून बिंबविल्या जाते. आयुष्यात कितीही अडथळे आले तरी त्यावर खिलाडूवृत्तीने खेळाडू विजय मिळवितोच. याचा प्रत्यय १४ वर्षाखालील नाशिक विभागाच्या खो-खो संघाने आणून दिला. राज्यस्तरीय शालेय स्पर्धेकरिता अमरावतीला जात असताना प्रवासादरम्यान भीषण अपघात होऊनही चिमुकल्यांनी स्पर्धा स्थळ गाठून अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली.नाशिक विभागाचा सामना उद्या शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी लातूर विभागासोबत होणार आहे. बुधवारी नाशिक विभाग संघ अमरावतीला जात असताना अकोल्यातील बोरगावमंजू जवळ अपघात झाला. यामध्ये ४ खेळाडू किरकोळ जखमी झाले. तर दोन शिक्षक आणि गाडी चालक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. क्रीडा शिक्षक संजय मैंद यांनी नाशिक संघाला सर्वोतोपरी तत्काळ मदत केली. हॉकी अकोला संघटनेचे सचिव धीरज चव्हाण यांना अपघाताची माहिती मिळताच सर्वोपचार रुग्णालय गाठले. त्यानंतर खेळाडूंना खेळण्यास प्रोत्साहित करू न चव्हाण यांनी खासगी वाहनाने रात्री २.३० वाजता अमरावती येथे सुखरू प पोहचविले. गुरुवारी सकाळी नाशिक विभाग संघाने स्पर्धेत दमदार खेळी करीत अंतिम फेरीसाठी पात्रता सिद्ध केली.
क्रीडा क्षेत्र धावला मदतीलाअपघाताची माहिती मिळताच अकोला क्रीडा क्षेत्र मदतीला धावून आला. क्रीडा शिक्षक संजय मैंद, राजू दहापुते, क्रीडा अधिकारी दिनकर उजळे, धीरज चव्हाण, प्रमोद म्हैसने, संजय तायडे, मुख्यध्यापक पंडित वानखडे यांनी तत्परता दाखविली. खेळाडूंची उपचार, भोजन व्यवस्था केली. जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी आस्थेने चौकशी करू न खेळाडूंना स्पर्धेसाठी पुढील व्यवस्था करू न दिली.आयुष प्रसाद यांनी अपघातग्रस्त खेळाडूंशी साधला संवादअमरावती येथे राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी जात असताना बोरगाव मंजू येथे नाशिकच्या संघाचा अपघात झाला. यातील जखमींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुरुवारी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या उपचाराबाबत माहिती घेतली. तसेच आदिवासी विकास विभागाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मानवतेचा परिचयमहिला क्रीडा शिक्षकांना गुरुवारी सकाळी अपघाताची माहिती मिळाली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर जखमींची आस्थेने विचारपूस केली. जखमी चिमुकल्या खेळाडूंना आपलेसे करू न मायेने कुरवाळले. फळ, सुकामेवा, अल्पोपाहार, भोजनाची व्यवस्था केली. मायेने घास भरविले. नात्यांपेक्षाही मानवता श्रेष्ठ असल्याचे याप्रसंगी उपस्थितांनी अनुभवले. ज्योती चंदन, शीला कोकाटे, वर्षा बोबडे, संगीता बारड, अर्चना मेतकर, आशालता काळे या शिक्षकांनी मानवतेचा परिचय दिला.