अकोला: दहावी व बारावी परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांना २५ जानेवारी २0१९ च्या शासन निर्णयान्वये सुधारित नियमावलीनुसार सवलतीचे वाढीव गुण दिले जाणार आहेत. याबाबत शासनाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांनुसार सवलतीच्या गुणांमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना क्रीडा, एनसीसी, स्काउट आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वाढीव गुण देण्यासंदर्भात अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने २ फेब्रुवारी रोजी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र दिले आहे.मध्यंतरी शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण द्यायचे की नाहीत, याबाबत चर्चा सुरू होती; परंतु शासनाला विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यासंदर्भात निवेदने देण्यात आली. त्याचा विचार करून शासनाने सवलतीच्या गुण देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दहावी व बारावी फेब्रुवारी, मार्च २0१९ परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांसह एनसीसी, स्काउट गाइड आणि राज्य, राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाºयांना आता सवलतीचे वाढीव गुण मिळणार आहेत. या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळण्याच्या दृष्टिकोनातून मुख्याध्यापक व प्राचार्यांनी कार्यवाही करून पात्र विद्यार्थी गुणांपासून वंचित राहणार नाहीत. यासाठी प्रयत्न करावेत. असे अमरावती विभागीय मंडळाने स्पष्ट केले आहे.असे मिळणार सवलतीचे वाढीव गुण!जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा, नेहरू हॉकी कप, सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा, भारतीय खेळ प्राधिकरणाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा, पॅरालिम्पिक्स कमिटी आॅफ इंडियामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा, खासगी असोसिएशनच्या क्रीडा स्पर्धेतील सहभागी प्रथम ते तृतीय क्रमांकापर्यंत खेळाडूंना पाच गुण, विभागस्तरीय स्पर्धेतील खेळाडूंना १0, राज्य स्पर्धेतील खेळाडूंसह दिव्यांग क्रीडा, आदिवासी क्रीडा स्पर्धा, राज्य अजिंक्यपद स्पर्धा खेळाडूंना १५ गुण, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना २0 गुण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना २५, आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडूंना २0 गुण मिळणार आहेत.एनसीसी, स्काउट गाइड व सांस्कृतिकचे असे मिळतील गुणएनसीसीमधील विद्यार्थ्याला बीएलसी कॅम्पसाठी ३ गुण, प्री आरडी कॅम्पसाठी ५ गुण, प्रजासत्ताक दिन संचलन, शिबिरासाठी १0 गुण, प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय शिबिर व स्पर्धा पदक विजेत्यास १५ गुण, आंतरराष्ट्रीय युथ एक्सचेंज प्रोग्रॉममध्ये सहभाग २0 गुण, स्काउट व गाइडमध्ये राज्यपाल पदक प्राप्त ३ गुण, राष्ट्रपती पदक, आंतरराष्ट्रीय जांबोरी शिबिरात सहभाग १0 गुण दिले जाणार आहेत.