मूर्तिजापूर : शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोबाईल चोरी व घरफोडीतील आरोपी यास न्यालयात हजर केले असता आरोपीने पोलीसांना चकमा देऊन पलायन केल्याची घटना मंगळवारी घडली. तेव्हा पासून पोलीसांनी आरापीचा शोध लावून बुधवारी सकाळी ८ वाजता पथ्रोट येथून अटक केली.
शहरात होत असलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे, अशाच एका घटनेतील आरोपी अनील करण धुर्वे (२६) राहणार पथ्रोट तालुका अचलपुर याला सोमवारी शहर पोलीसांनी पथ्रोट येथून ताब्यात घेतले, सदर आरोपीस ९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान स्थानिक न्यायालयात हजर करण्यासाठी नेले असता आरोपी गार्ड असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चकमा देऊन न्यायालय परिसरातून धुम ठोकली तेव्हा पासून आरोपी फरार होता. त्याला बुधवारी सकाळी ८ वाजता पोलीसांनी पथ्रोट येथून ताब्यात घेतले. रात्रभर केले सर्च ऑपरेशन
आरोपी पळाला तेव्हा पासून अनेक ठिकाणी पोलांनी नाकेबंदी केली. आरोपीचा युध्दस्तरावर शोध सुरु केला यासाठी पोलीसांनी रात्रभर सर्च स्टिंग ऑपरेशन राबविण्यात आले. बुधवारी पहाटे ४ वाजता पासून पथ्रोट येथे आरोपीच्या मागावर राहून सकाळी ८ वाजता त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली नागोराव भांगे, स्वप्नील खडे, रवी जाधव, गजानन खेडकर यांनी पार पाडली.