बुधवारी चार आरोपींना पातूर न्यायालयात हजर केले. चौघांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. विवाहितेच्या घरात घुसून विनयभंग व शिवीगाळ करून तिच्या आईला मारहाण केल्याची घटना १ मार्च रोजीच्या सायंकाळी सुमारास घडली होती. या मारहाणीमध्ये ५० वर्षीय महिला चंद्रकलाबाई मधुकर घटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जुन्या वादाच्या कारणावरून एका आरोपीने विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा हात पकडून विनयभंग करून नऊ आरोपींनी विवाहितेच्या आईला मारहाण केली. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी आरोपी रामेश्वर नागोजी चवरे, महादेव नागोजी चवरे, श्रीकृष्ण गजानन बघे, मंगेश गजानन बघे व पाच महिला असे एकूण नऊ आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली होती. उर्वरित पाच महिला आरोपींपैकी गुरुवारी चार आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस कोठडी संपल्याने आठ आरोपींना गुरुवारी पातूर न्यायालयात हजर केले. आठही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याचे आदेश पातूर न्यायालयाने दिले आहेत.
मारहाण प्रकरणातील आरोपींची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:19 AM