तेल्हारा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका विद्यार्थिनीला आरोपी प्रशांत वासुदेव रोठे याने रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३४१, ३५४, पोस्कोनुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष एस. गणोरकर यांनी आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पीडितेला १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सरकारतर्फे ॲड. जी. एल. इंगोले यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास पीएसआय करुणा आत्राम यांनी केला व कोर्ट पैरवी म्हणून हेड कॉन्स्टेबल रामेश्वर राऊत यांनी काम पाहिले. आरोपीच्या विधिज्ञांनी शिक्षा स्थगिती करण्यासाठी अर्ज दाखल केला. परंतु न्यायालयाने अर्ज नामंजूर केला.
विनयभंग प्रकरणातील आरोपीस तीन वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:19 AM