अकोला : शहरासह जिल्ह्यात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईसाठी वाहतूक शाखा प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात रविवारी शहरात एक विशेष मोहीम राबवित तब्बल २१२ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईतून तब्बल एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, वाहतूक शाखेकडून अशा प्रकारची ही मोठी मोहीम राबविण्याची पाचवी मोहीम असल्याची माहिती आहे.सिटी कोतवालीचे ठाणेदार तथा वाहतूक शाखा प्रमुख विलास पाटील यांनी रविवारी पहाटेपासूनच अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांसह, विनापरवाना वाहन चालविणारे, ट्रिपल सीट, विनाक्रमांकाच्या दुचाकी, बुलेटवरील फटाके फोडणाºया दुचाक्या, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनांवर कारवाई करण्यात आली. शहरासह राष्ट्रीय महामार्गावर मोहीम राबवून तब्बल २१२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी दिवसभर ही मोहीम राबविण्यासाठी सहकार्य केले. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख व शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत लाखाचा दंड वसूल करण्यात आला असून, आॅटोचालक व ओमनी व्हॅन चालकांना योग्य प्रवासी वाहतूक करण्यासाठी सूचना वाहतूक शाखा प्रमुख विलास पाटील यांनी केल्या. या कारवाईत दंड वसुलीसोबतच काही प्रकरणात न्यायालयात पाठविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईसाठी मोहीम सुरूच राहणार आहे. त्यामूळे आॅटोचालक, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन, ट्रिपल सीट दुचाकी चालविणारे व विनापरवाना वाहन चालविणाºयांवर कारवाईचा सपाटा सुरूच राहणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी शिस्तीत वाहने चालवून वाहतूक नियमांचे पालन करावे.विलास पाटील,प्रमुख, वाहतूक शाखा अकोला.