सचिन राऊत अकोला, दि. २४- शहरासह जिल्हय़ात तीन दशकांपूर्वी घडलेल्या विविध गुन्हय़ातील ४७ आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेने एक विशेष मोहीम राबवून कारवाई केली. यामधील ३७ आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने या आरोपींविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करून त्यांची न्यायालयीन तसेच पोलीस कोठडीत रवानगी केली.जिल्हय़ात चोरी, लुटमार, हाणामारी, विनयभंग, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे करून ३0 वर्ष ते त्यापेक्षा अधिक कालावधीपासून फरार असलेल्या ४७ आरोपींवर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेने न्यायालयाच्या आदेशानंतर एक विशेष मोहीम राबविली. एक महिनाभर राबविलेल्या या विशेष मोहिमेत जिल्हय़ातील ४७ आरोपींवर कारवाईसाठी हालचाली करण्यात आल्या. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या आरोपींचा शोध घेतला; मात्र १0 आरोपींचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले, तर उर्वरित ३७ आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या ३७ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून हे आरोपी आता कारागृहात आहेत.हे आहेत ३0 वर्षांंपूर्वी फरार झालेले आरोपीसुकळी येथे फेब्रुवारी २00८ मध्ये रोकडे नामक इसमास मारहाण करणार्या आकाराम राऊजी इंगोले, रमेश ओंकार कांबळे या दोघांना १0 वर्षानंतर अटक करण्यात आली. बैदपुरा येथे १९९१ मध्ये झालेल्या मारहाणीतील सलीम खा रहीम खा यास तब्बल २६ वर्षांनी अटक केली. कैलास टेकडी येथील रहिवासी तसेच ३0 वर्षांंपूर्वी म्हणजेच १९८७ मध्ये एका चोरी प्रकरणातील आरोपी विजय पुंजाजी खुनसिंगे यास ३0 वर्षांंनंतर अटक केली. २६ वर्षांंपूर्वी चोरीचा प्रयत्न करणार्या तापडिया नगरातील रहिवासी प्रकाश परमसुख भुतडा यास २६ वर्षांंनंतर अटक केली. चोरी प्रकरणात गत १४ वर्षांंपासून फरार असलेल्या रतन गाठोरे यास अटक केली. २५ वर्षांंनंतर १३ दिवस शिक्षापोलीस कर्मचारी मोतीराम यांच्या अंगणातून ३१ ऑक्टोबर १९९१ रोजी सायकल चोरीला गेली होती. या प्रकरणी न्यायालयाने २५ वर्षानंतर राजू अवचितराव देशमुख यास १३ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.१४ वर्षांंपूर्वी पळालेल्या मुलाचा शोधशहरातील दिवेकर आखाडा परिसरातील रहिवासी संचित पुंडलीक डांगे हा मुलगा २00३ मध्ये म्हणजेच १४ वर्षांंपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. केरळमध्ये राहत असलेल्या या मुलाचा शोध घेऊन त्याला आईच्या स्वाधीन केले.
तीन दशकांपूर्वी घडलेल्या गुन्हय़ांतील ४७ आरोपींवर कारवाई
By admin | Published: March 25, 2017 1:36 AM