अकोला : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील काही भाग नव्याने कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता ‘नो मास्क, नो एंट्री’ मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मास्क न लावणाऱ्या १५२ जणांवर कारवाई करण्यात आली.
कोविड-१९ चे संक्रमण कमी करण्यासाठी मास्क वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीय नियमाची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज धडक मोहीम राबवून शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करून त्यांना मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन करून आवाहन करण्यात आले. या मोहिमेत त्याच्यासोबत उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार मेहेंद्र आकराम, पोलीस निरीक्षक उत्तमराव जाधव, परिवहन नियंत्रक विभागाचे शेळके, महसूल व महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. नागरिक विनामास्क निष्काळजीपणे फिरत असताना दिसून येतात. याला आळा घालण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी धडक मोहीम राबवून मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
१५२ व्यक्तींकडून ३० हजार ४०० रुपये इतका दंड वसूल
अकोला तहसील कार्यालय ६३,
बार्शीटाकळी १४,
मूर्तिजापूर ०८
पातुर ०४
अकोट ३१
बाळापूर २२
तेल्हारा १०