शहरात वाढत असलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे व चेन स्नॅचिंगच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने कागदपत्रे जवळ न बाळगता किंवा मोबाइलच्या डीजी लॉकर किंवा तत्सम अधिकृत ॲपवर स्कॅन कॉपी न ठेवता वाहन चालविणाऱ्यांची वाहने वाहतूक कार्यालयात जमा करून ठेवण्याची मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांकडे वाहनांची कागदपत्रे नाहीत, अशा वाहनांची कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर दंडात्मक कारवाई करून सोडण्यात येत आहेत. या मोहिमेचे फलित म्हणून आतापर्यंत तीन चाेरीच्या दुचाक्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत एकूण दाेन हजार ९०० दुचाकी वाहतूक कार्यालयात ठेवण्यात आल्या असून, यामधील बहुतांश दुचाकी दस्तावेज पडताळणी केल्यानंतर साेडण्यात आलेल्या आहेत. मात्र, ४ दुचाकी आताही वाहतूक कार्यालयात असून, या दुचाकींची वैध कागदपत्रे सादर न केल्यामुळे या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत
पाेलीस. अधीक्षकांची संकल्पना
चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून कागदपत्रे न बाळगणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी माेहीम सुरू करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार ही मोहीम राबवीत आहेत.
कालावधी सहा महिने
दुचाकींवर कारवाई २ हजार ९००
पाेलीस अंमलदार ७०
चाेरीच्या दुचाकी ०३
बेवारस असलेल्या दुचाकी ०४