अकोला शहरात जवळपास सर्व प्रमुख मार्गांवर रस्त्यांची विकासकामे सुरू असल्याने वाहतूक नियंत्रित करताना वाहतूक कर्मचाऱ्यांची धावपळ होते, त्यात अकोला शहराच्या क्षमतेच्या पाच पट ऑटो शहरात धावतात,त्यामुळे शहरात वेळोवेळी वाहतुकीचा खोळंबा होतो, यासाठी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी वेळोवेळी ऑटो चालकांची स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन केले, परंतु ऑटो चालकांमध्ये सुधारणा दिसून न आल्यामुळे साेमवारी कारवाईचा बडगा उचलला. नियम माेडणाऱ्या तब्बल ४० ऑटाेवर कारवाई करण्यात आली असून सर्व ऑटाे वाहतूक कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत.
कागदपत्रे जवळ न बाळगणारे व दंड न भरणारे ऑटो वाहतूक कार्यालयात लावण्याची कारवाई सुरू करून एकाच दिवसात ४० ऑटो ट्रॅफिक ऑफिसमध्ये लावून प्रलंबित दंड भरून घेऊन व कागदपत्रे दाखविल्या नंतरच त्यांना सोडण्यात आले, आज एकाच दिवशी ऑटो चालकांकडून ५८,000 चा दंड वसूल करण्यात आला, ही मोहीम संपूर्ण महिनाभर सुरूच राहणार असून ऑटो चालकांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेला दंड भरावा तसेच वाहतूक नियमांचे पालन करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अन्यथा त्यांचे ऑटो ट्रॅफिक ऑफिसमध्ये लावण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिला आहे