लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित असलेल्या कारंजा येथील के. एन. महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन पेढीवाल यांच्या आत्महत्येमागे असलेल्या संस्थेच्या दोन वरिष्ठ संचालकांवर प्राचार्यांच्या मुलाच्या बयानानंतर पुणे पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत. अशी माहिती कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील के. एन. महाविद्यालयात गजानन लक्ष्मीनारायण पेढीवाल (५४) हे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचा मुलगा पुण्यातील हिंजवडी येथील एका कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असून, तो येवलेवाडी परिसरात आईसोबत पुण्याला राहतो. पुण्यातील मार्व्हल अलबेरो या सोसायटीत पेढीवाल यांचे कुटुंबीय रहिवासी असल्याने तसेच बीजीई सोसायटीच्या दोन वरिष्ठ संचालकांनी दिलेल्या प्रचंड त्रासामुळे प्राचार्य पेढीवाल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.आत्महत्या करण्यापूर्वी पेढीवाल यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यामध्ये दोन वरिष्ठ संचालकांवर आरोप केला आहे. एवढेच नव्हे, तर या दोन संचालकांच्या प्रचंड जाचाला क ंटाळूनच आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. यावरून पुणे पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे; मात्र पेढीवाल यांचे पूर्ण कुटुंबीय अकोल्यात असल्याने पुणे पोलिसांना त्यांच्या मुलाचे बयाण अद्याप मिळाले नाही. पेढीवाल यांच्या मुलाचे बयाण घेतल्यानंतर सदर दोन संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.चिठ्ठीतील हस्ताक्षर पेढीवाल यांचेच असल्याचेही स्पष्ट झाले असल्याची माहिती आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत संस्थेच्या व्यवस्थापनातील दोन वरिष्ठ संचालकांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.संचालकांची चौकशीआत्महत्या प्रकरणात संस्थेचे संचालक डॉ. भावे आणि चवरे यांची पुणे पोलीस चौकशी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.
मुलाच्या बयानानंतर ‘त्या’ संस्थाचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 2:27 AM
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित असलेल्या कारंजा येथील के. एन. महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन पेढीवाल यांच्या आत्महत्येमागे असलेल्या संस्थेच्या दोन वरिष्ठ संचालकांवर प्राचार्यांच्या मुलाच्या बयानानंतर पुणे पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत. अशी माहिती कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील के. ...
ठळक मुद्देपुणे पोलिसांची माहिती: प्राचार्यांची आत्महत्या प्रकरण