अकोला: राज्य शासनाने प्लास्टिक तसेच थर्माकोल बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात सर्वत्र खुलेआम प्लास्टिक पिशव्या व त्यापासून तयार होणाºया वस्तूंची विक्री व वापर सुरू आहे. गुरुवारी अचानक महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशानुसार चारही क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शहरात धाडसत्र राबविले असता, प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची कारवाई केली. यादरम्यान, उत्तर व दक्षिण झोनमध्ये प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन व विक्री करणाºया व्यावसायिकांना जाणीवपूर्वक अभय दिले जात असल्याने प्रशासनाच्या कारवाया संशयाच्या भोवºयात सापडल्या आहेत.प्लास्टिक व थर्माकोलपासून तयार होणाºया विविध प्रकारच्या वस्तू व त्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होते. शहरातील सर्व्हिस लाइन, सार्वजनिक जागा, गटारे आदी ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे दिसून येते. नाले-गटारांमधील घाण पाणी वाहून जाण्यासाठी प्लास्टिक पिशव्या आडकाठी ठरत आहेत. उघड्यावर साचलेल्या प्लास्टिक पिशव्यांमधील खाद्यपदार्थ खाल्ल्याने मोकाट जनावरांचा जीव धोक्यात सापडला आहे. शासनाने जून २०१८ मध्ये प्लास्टिकपासून तयार होणाºया विविध वस्तूंसह पिशव्यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. उत्पादने करणाºया कारखान्यांवरही कारवाई करण्याचे अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, जिल्हाधिकारी तसेच महापालिका प्रशासनाला दिले होते. गुरुवारी अचानक मनपाच्या चारही क्षेत्रीय अधिकाºयांना याप्रकरणी कारवाई करण्याचा आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी जारी केला. त्यानुसार शहराच्या विविध भागात धाडसत्र राबविण्यात आले असता १ लाख ७३ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.उत्तर झोनमध्ये दुकानदारीशहरात प्लास्टिक पिशव्या व इतर वस्तूंचे सर्वाधिक उत्पादन उत्तर झोनमध्ये होते. त्यापाठोपाठ दक्षिण झोनचा क्रमांक येतो. उत्तर झोन अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य निरीक्षकांना याची पूर्ण माहिती असताना संबंधित व्यावसायिकांना अभय दिल्या जात असल्याची माहिती आहे. या माध्यमातून संबंधितांची दुकानदारी जोरात सुरू आहे. या प्रकाराची आयुक्त दखल घेतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.व्यावसायिक त्रस्त; पदाधिकाºयांमध्ये नाराजीमनपाने धाडसत्र राबविताच काही व्यावसायिकांनी जाणीवपूर्वक आम्हालाच ‘टार्गेट’ केल्या जात असल्याचे सांगत मनपा पदाधिकाºयांकडे गाºहाणे मांडले. मनपाच्या कारवाईमुळे पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. दुसरीकडे क्षेत्रीय अधिकाºयांना दररोज कारवाई करण्याचे फर्मान आयुक्तांनी सोडल्याने आगामी दिवसांत पदाधिकारी विरुद्ध आयुक्त असा सामना रंगण्याचे संकेत आहेत.
कारवाईतही भेदभावमनपातील आरोग्य निरीक्षकांना शहराच्या कानाकोपऱ्यातील खबरबात आहे. जो व्यावसायिक खिसे जड करील, त्याला बाजूला सारून इतर व्यावसायिकांवर कारवाया केल्या जात आहेत. प्रशासनाला दाखविण्यासाठी दोन-तीन थातूरमातूर कारवाया केल्या जातात, तर जाणीवपूर्वक ठरावीक भागातील व्यावसायिकांनाच ‘टार्गेट’ केल्या जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.