अकोला: पुरवठा विभागाच्या दोन पथकांनी बुधवारी अकोल्यातील ह्यएमआयडीसीह्ण मधील तीन गोदामांवर धाडी टाकून, ४ कोटी २९ लाख ६६ हजार ८00 रुपयांचा हरभरा, हरभरा डाळ, मूग आणि सोयाबीनचा अवैध साठा जप्त केला. तिन्ही गोदामांना सील करून, साठेबाजांवर कारवाई करण्यात आली तूर डाळीच्या साठेबाजी विरोधात देशभरात पुरवठा विभागामार्फत धाडी टाकून साठेबाजी करणारांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला जिल्हा पुरवठा विभागामार्फत दोन पथकांनी बुधवारी दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अकोल्यातील ह्यएमआयडीसीह्णमधील तीन गोदामांवर धाडी टाकल्या. त्यामध्ये माणिकजी पल्सेस गोदामातून १ हजार ४९२ क्विंटल हरभरा डाळ आणि ३३८ क्विंटल मूग, हिरा अँग्रो इंडस्ट्रिजमधून १ हजार १३ क्विंटल हरभरा आणि कारगिल इंडिया प्रा.लि.च्या गोदामातून ५ हजार ८८२ क्विंटल सोयाबीन, असा एकूण ४ कोटी २९ लाख ६६ हजार ८00 रुपये किमतीचा अवैध साठा जप्त करण्यात आला. विनापरवाना साठा आढळून आल्याने, तीनही गोदामांना ह्यसीलह्ण लावून, अवैध साठा जप्त करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, अकोल्याचे तहसीलदार संतोष शिंदे, अकोला शहर अन्न-धान्य वितरण अधिकारी रवी काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
साठेबाजांवर कारवाई; ४.२९ कोटींचा साठा जप्त
By admin | Published: October 22, 2015 1:51 AM