लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - शहरातील बेताल वाहतुकीला जबाबदार असलेल्या तसेच अनेकवेळा गंभीर अपघातास कारणीभूत ठरणार्या वाह तूक नियमांचे उल्लंघन करणार्या २२ जड वाहनांवर वाहतूक शाखेकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांकडून ४४ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे अकोलेकर त्रस्त झाले आहेत. बेशिस्तीचा सर्वाधिक त्रास अँटोरिक्षा व जड वाहनांचा असून, यामुळे अ पघातांचे प्रमाण वाढले आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे अन्य वाहनांना प्रचंड त्रास होत असून, कुठेही वाहने थांबवण्यात येत असल्याने दोन गटात हाणामारी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. ऑटोरिक्षा कुठे व केव्हा थांबेल, हे सांगता येत नसल्याने इतर वाहन चालकांना सतत अँटोरिक्षाकडे पाहतच वाहन चालवावे लागते. ऑटोरिक्षा चालकांसोबतच जड वाहनांचा सर्वाधिक त्रास मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसर, गांधी चौक व गांधी रोडवर होतो. त्यामुळे या जड वाहनांना शिस्त लागावी, यासाठी मोहीम राबवविण्यात येत असून, या मोहिमेत वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात तब्बल २२ जड वाहनांवर कारवाई करीत, ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जड वाहनांवर कारवाईचा सपाटा सुरूच राहणार आहे. बुधवारी जड वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, यापुढेही ही कारवाई करण्यात येणार आहे. बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्याचा वाहतूक शाखेकडून प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी व वाहनचालकांनी सहकार्य करावे.- विलास पाटील, प्रमुख वाहतूक शाखा, अकोला.