पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीवरून वाडेगाव पोलिसांनी चान्नी फाटा-वाडेगाव येथे अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणारा रोहित सरोदे रा.अकोला यांना पकडले. त्याच्याकडून देशी दारूचे १४४ क्वार्टर, अंदाजे किंमत ७,४८८ रुपये व दुचाकी क्रमांक एमएच ३० बीएच ८४२८ किंमत ३० हजार रुपये, असा एकूण ३७, ४८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वाडेगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक वासाडे व त्यांच्यासोबत असलेले पोलीस स्टॉपमधील पोलीस हेड कान्स्टेबल रवींद्र अहेरकर, अमर पवार, निखिल सूर्यवंशी यांनी केली.
वाडेगाव-चान्नी रस्त्यावर दारूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:52 AM