शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वेगाने वाहन चालविणाऱ्या दीड हजार वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 4:29 PM

शहर वाहतूक शाखेने नवीन इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगणचा उपयोग करून कारवायांचा धडाका लावला आहे.

अकोला - वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात नवीन वर्षातील जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात तब्बल एक हजार ७०० वाहनांवर इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगणचा वापर करून कारवाई करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेने नवीन इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगणचा उपयोग करून कारवायांचा धडाका लावला आहे.शहरासह जिल्ह्यात वेळोवेळी मोहीम राबवून टपोरीगिरी करणारे, चालू वाहनांवर स्टंटबाजी करणारे, वेगाने वाहन चालविणारे, मोटरसायकलवर क्रमांक टाकण्याऐवजी भलतेच काही लिहिणारे वाहनचालक हेरून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेकडून मोहीम राबविण्यात येत आहे. हीच मोहीम जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात राबविण्यात आली असून, यामध्ये तब्बल एक हजार ७०० पेक्षा अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या दंडात्मक कारवाईसोबतच वाहन ट्राफिक आॅफिसला जप्त करण्याची कारवाईही करण्यात आली आहे. शहरातील सर्वच प्रमुख रस्ते, यामधील नेकलेस रोड, नेहरू पार्क ते अशोक वाटिका ते अग्रसेन चौक, अकोट स्टँड ते शिवाजी महाविद्यालय, या रोडची विकास कामे सुरू असल्याने शहर वाहतूक शाखेची वाहतूक सुरळीत ठेवण्यात जास्त मनुष्यबळ खर्ची पडत आहे; मात्र तरीसुद्धा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशानंतर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी वेळोवेळी विशेष मोहीम राबवून टपोरीगिरी व स्टंटबाजी करणारे वाहनचालक, नंबर प्लेटवर वेगळाच मजकूर लिहिणारे, कागदपत्रे जवळ न बाळगणारे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणारे, ट्रिपल सीट तसेच धावत्या वाहनांवर मोबाइलवर बोलणाºया वाहनचालकांवर धडक कारवाई करून दोन महिन्यात जवळपास 9 हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांकडून सुमारे १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशा प्रकारची धडक मोहीम सुरूच राहणार असून, सध्या परीक्षेचे दिवस असल्याने पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस