शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी तयार होणार कृती आराखडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 2:28 PM

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येणार आहेत.

- संतोष येलकरअकोला : संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यांसाठी पाणीटंचाई निवारणाकरिता उपाययोजनांचा आराखडा तयार करून, शासनाकडे सादर करण्याचे निर्देश २८ सप्टेंबर रोजी शासनामार्फत काढण्यात आलेल्या परिपत्रकात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाºयांना देण्यात आले. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येणार आहेत.राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असला, तरी काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागात येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने राज्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांसासाठी २०१८-१९ या वर्षाकरिता संभाव्य पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करून, शासनाकडे सादर करण्याचे निर्देश शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २८ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित अधिकाºयांना देण्यात आले. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या विविध उपाययोजनांचे कृती आराखडे जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येणार आहेत.टंचाईत लाभ होणाºया उपाययोजना प्रस्तावित करा!पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करताना पाणीटंचाईच्या कालावधीतच लाभ होऊ शकेल, अशा कमी खर्चाच्या उपाययोजना पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात येतील, यासंदर्भात जाणीवपूर्वक दक्षता घेण्याच्या सूचनाही शासनाच्या परिपत्रकात देण्यात आल्या.तातडीच्या उपाययोजनांसाठी खर्च, वेळेचा विचार करावा!संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना ठरविताना त्यासाठी होणारा खर्च, भविष्यात होणारा फायदा तसेच उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी लागणारा वेळ या बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात यावा, अशा सूचना शासन परिपत्रकात देण्यात आल्या.कार्यक्षम स्थितीतील टँकर्स उपलब्ध करा!पाणीटंचाईग्रस्त गावांना शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी मागणी करतील, त्यावेळी पूर्णपणे कायक्षम स्थितीतील टँकर्स उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासन परिपत्रकानुसार संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांना देण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी