शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

गुणाकार, भागाकारात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 2:32 PM

जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षामध्ये सलग दुसऱ्यांदा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

अकोला: अनेक विद्यार्थ्यांना गणित विषय कठीण, क्लिष्ट वाटतो. त्यामुळे विद्यार्थी बऱ्याचदा गणित विषयापासून दूर पळतात. विद्यार्थ्यांना गुणाकार व भागाकार करताना अडचणी येतात. नव्हे, तर अनेक विद्यार्थ्यांना गुणाकार व भागाकार जमतच नाही. यातून मार्ग काढण्यासाठी गतवर्षीप्रमाणेच यंदासुद्धा जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षामध्ये सलग दुसऱ्यांदा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता सातवीत शिकणाºया प्रत्येक तालुक्यातील १0 शाळांमधील १00 याप्रमाणे ७00 विद्यार्थ्यांची गुणाकार व भागाकाराची पूर्व चाचणी व उत्तर चाचणी घेण्यात आली. या दोन्ही चाचणीतून शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांनी काढलेल्या निष्कर्षानुसार विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम तयार केला होता. प्रायोगिक तत्त्वावर दोन महिने हा कृती कार्यक्रम राबविल्यानंतर पूर्व व उत्तर चाचणीमध्ये गुणाकार व भागाकाराची क्रिया करण्यामध्ये १0 ते १२ टक्के विद्यार्थ्यांमध्ये फरक दिसून आल्याचे जाणवले. तो सरत्या शैक्षणिक वर्षामध्ये राबविण्यात आला. या कृती कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये कितपत बदल घडला, हे दिसून आले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत कृती कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये शिकणाºया अनेक विद्यार्थ्यांना गुणाकार व भागाकार जमत नाही. गणित विषय बौद्धिक क्षमतेच्या पलीकडे जात असल्याने या विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण झाली पाहिजे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील शाळांची निवड करून विद्यार्थ्यांसाठी दुसºया वर्षीही कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. सध्या माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरू आहेत तर काही शाळांच्या परीक्षा आटोपल्या आहेत. उन्हाळी सुटी संपल्यानंतर शैक्षणिक सत्राच्या पहिल्या टप्प्यात या शाळांमध्ये कृती कार्यक्रमानुसार विद्यार्थ्यांना गणित विषय समजेल आणि त्यांच्यामधील गुणाकार व भागाकाराची भीती दूर होईल. यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. (प्रतिनधी)गुणाकार व भागाकाराचे संबोध घेतले आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती व गणितपेटी साहित्यावर आधारित शिकविले, सराव दिला तर गणित समजणे सोपे जाते. प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या कृती कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचा पूर्ण कल अद्याप यायचा आहे. तो कळल्यावर येत्या शैक्षणिक वर्षातही गुणाकार व भागाकारासाठी कृती कार्यक्रम राबवू.-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य.जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी