अकोला, दि. १६- प्रचार करण्यासाठी एकाच जागेवर वाहन उभे करून प्रचार करण्याची परवानगी असताना सदर वाहन विविध ठिकाणी फिरवित प्रचार करणार्या वाहनांवर पोलिसांनी दुसर्या दिवशीही कारवाई केली. उमेदवारांनी लाऊडस्पीकर लावून जोरदारपणे गाणे वाजविण्याचा प्रकार केला; परंतु हे गाणे वाजविताना वाहने एकाच ठिकाणी उभी करून ती वाजविणे आवश्यक होती; परंतु प्रचार वाहनांनी असे न करता थेट नियमांचा भंग करीत धावत असताना लाऊडस्पीकर सुरूच ठेवले. नियमांचा भंग झाल्याने पोलिसांनी अशा प्रकारे फिरणार्या प्रचार वाहनांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये वाहनांची पोलीस ठाण्यात नोंद घेऊन त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच ती वाहने जप्तही केली आहेत. ही कारवाई सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, खदानचे ठाणेदार गजानन शेळके, जुने शहरचे रियाज शेख, सिव्हिल लाइनचे अन्वर शेख, रामदासपेठचे प्रकाश सावकार, डाबकी रोडचे विनोद ठाकरे यांच्या पथकांकडून करण्यात आली.
फिरता प्रचार करणा-या वाहनांवर दुस-या दिवशीही कारवाई
By admin | Published: February 17, 2017 2:39 AM