अकोट, दि. १६- अकोट नगर परिषदेतर्फे शहरात मालमत्ता थकीत कर वसुली धडक मोहीम राबविल्या जात आहे. यामध्ये मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी १६ मार्च रोजी शाळा, सिनेमागृह व दुकानांवर जप्तीची कारवाई करून सिल केले. शिवाय काही मालमत्ताधारकांनी एका दिवसात बांधकाम परवानगी न दिल्यास दुप्पट कर आकारणी करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. अकोट नगर परिषदेची गेल्या काही वर्षांपासून शहरातील मालमत्ताधारकांकडे कोट्यवधींची कराची थकबाकी आहे. पर्यायाने विकासालासुद्धा खीळ बसत आहे. अशा स्थितीत कर वसुलीकरिता धडक मोहीम राबविल्या जात आहे. या मोहिमेत आज श्रीनिवास टॉकीज, भाऊसाहेब पोटे विद्यालय, आसुदामल जेसवानी यांचे घर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे भोगवटदार अनिल गावंडे, नरेश गुप्ता, अशोक गोठवाड यांच्या दुकाने मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे सदर मालमत्ता जप्त करून सील लावण्यात आले. तसेच मिश्रा संकुलमधील हरिप्रसाद मिश्रा, आर.एन. राठी, चव्हाण, नामदेवराव नांदूरकर, गजानन कोकाटे या मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्या निर्देशानुसार निवासी मालमत्ताधारकांना २0 मार्च, अनिवासी मालमत्ताधारकांना १८ मार्चपर्यंत थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याचे आवाहन केले. सदर कारवाईमध्ये कर अधीक्षक गौरव लोंदे, विजय सारवान, सुभाष घटाळे, शरद तेलगोटे, मरकाम, नरेश ठाकूर, श्रीकांत र्मदाने, दत्ता सोळंके, मनोज पिंपळे, वसंत मेंगजे, शेख शाहरुख, नितीन हाडोळे, केंद्रे, जाहिद खा, मोहन गुजर, राधेश्याम र्मदाने व आरोग्य विभागातील इतर न.प. कर्मचारी हजर होते. शहरातील मालमत्ताधारकांनी आपल्याकडील कराची थकबाकी जमा करून अप्रिय कारवाई टाळावी, नगर परिषदेला सहकार्य करावे. - गीता ठाकरे,मुख्याधिकारी, न.प. अकोट
अकोटात शाळा, सिनेमागृह, दुकानांवर जप्तीची कारवाई
By admin | Published: March 17, 2017 3:11 AM